स्वतःची गाडी पेटवून देत तरुणाने स्वतःही घेतले पेटून….
श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.१६. डिसेंबर):-नोकरीसाठी पहिल्या दिवशी नगर येथे हजर राहण्याआधीच श्रीरामपूर शहरातील(वार्ड नं.२.वैदुवाडी) येथील तरुण युवक विशाल रामा शिंदे वय २४ याने अगोदर स्वतःची मोटारसायकल जाळून त्यात स्वतःला जाळून घेतले.लोणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.त्याने आत्महत्या का केली की,त्याचा घातपात झाला याबाबत माहिती समोर आली नाही.पुढील तपास पोलीस करीत आहेत.