श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.१७. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील घुमरे वस्ती जंगलेवाडी येथील रहिवासी असलेले वामन पाटील व घुमरे वय वर्ष ९० यांच्यावर स्वतःच्या जावई व मुलीने किरकोळ कारणावरून हल्ला केला.मात्र ही भांडणं सोडवण्यासाठी मध्यस्थी गेलेल्या इसमाच्या डोक्यात जबरी मार लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे,यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला जावई आबा झुंबर जंगले राहणार जंगलेवाडी व त्यांची पत्नी सविता आबा जंगले यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक १४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास वामन घुमरे यांची नात गौतमी ही घुमरे यांच्या घरासमोर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आली होती मंदिराला कुलूप होते म्हणून गौतमीने आजोबांना विचारले कुलूप का लावले त्यावेळी येथून भांडी पुस्तके चोरीला जातात म्हणून मंदिराला कुलूप लावले आहे असे वामन घुमरे यांनी गौतमीला सांगितले तुला चावी लागत असेल तर चावी घरामध्ये आहे चावी घेऊन पंधरा वीस मिनिटे गौतमी मंदिरात बसली पुन्हा वामन घुमरे यांच्यापाशी जाऊन तुम्ही मुद्दाम मला वस्तू चोरीला गेल्याचे सांगतात मी काय चोर आहे का? मी आल्यामुळे तुम्ही मला असे म्हणतात असे गौतमी म्हणाली आजोबा वामन घुमरे यांनी किती समजत काढली होती तिथून निघून गेली.दुपारी चार वाजण्याची सुमारास वामन घुमरे यांची मुलगी व जावई हे वामन घुमरे यांना शिवीगाळ करायला लागले अंगावर धावून आले त्यावेळी वामन घुमरे यांचा सेवेकरी विठ्ठल मल्हारी टेंगले वय वर्ष 37 राहणार जंगलेवाडी श्रीगोंदा हे घुमरे यांना वाचवण्यासाठी मध्ये आले असता जावई आबा झुंबर जंगले यांनी तेथे पडलेले वीट टेंगले यांच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली तेथे पडला उचलून वामन घुमरे यांच्या पाठीत मारला धक्काबुक्की मध्ये योवृद्ध वामन घुमरे हे विटांच्या ढिगार्यावर पडले त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.घटनास्थळी असलेले ज्ञानदेव लाळगे मंगल डेंगळे विश्रांती करणार यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काही येत नाही वामन घुमरे यांचा सेवेकडी विठ्ठल टेंगळे हार्दिक शुद्ध अवस्थेत पडलेला पाहून मग ते दोघेजण तिथून निघून गेले निघून गेले जाताना त्यांनी जीव मारण्याची धमकी दिली.या घटनेनंतर वामन घुमरे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम 224 323 504 506 व 34 नुसार गुन्ह्यांची नोंद केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास रामराव ढिकले (पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रोहिदास झुंजार हे करीत आहेत.
Trending Topics:
Trending
- अहिल्यानगर जिल्ह्यात 933 किलो गांजाचा नाश..अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई!
- 📰 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना ‘भारत गौरव – २०२५’ पुरस्कार..विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने गौरव..सामाजिक,प्रशासनिक कार्याबद्दल सन्मान
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा..!समस्त मुस्लिम समाजाचा तीव्र निषेध; पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
- 🗞️अहिल्यानगर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर..१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती,सूचना दाखल करण्याचे आवाहन
- प्रभाग क्र.१३ मधून महिला राखीव उमेदवार परविन मनसूर सय्यद उतरणार निवडणुकीच्या रिंगणात..राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा तो इसम 24 तासांत अटकेत..अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
- इतकी हिंमत होतीच कशी..महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला अटक नाही तर आंदोलन पेटेल..! सकल आंबेडकरी समाजाचा इशारा
- अहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर