नगर प्रतिनिधी (दि.९ ऑगस्ट):-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अक्षेपार्ह ऑडिओ क्लिपच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नगर शहरात मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप शनिवारी व्हायरल झाली.या घटनेच्या निषेधार्थ नगर शहरातून सकल हिंदू समाजाच्या वतीने आज भव्य असा मोर्चा काढण्यात आला.नगर शहरातील बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करून सकल हिंदू समाजाच्या मोर्चास सुरुवात करण्यात आली.या मोर्चामध्ये तरुण वयोवृद्ध व महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.हा मोर्चा माळीवाडा,पंचपीर चावडी, माणिक चौक,कापडबाजार, चितळे रोडमार्गे दिल्लीगेट येथे येऊन या मोर्चाचे विराट सभेत रूपांतर होऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.
