नगर प्रतिनिधी (दि.९ ऑगस्ट):-एमआयडीसी परीसरात कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पकडण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. बातमीची हकीकत अशी की,दि.२९/०५/२०२३ रोजी यातील फिर्यादी नितीन सुधाकर गायकवाड (वय ३४ वर्ष,धंदा पानस्टॉल चेतना कॉलनी नवनागापुर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,दिनांक २९/०५/२०२३ रोजी साई पान स्टॉल चेतना कॉलनी अहमदनगर मनमाड रोडवर पान विक्री करत असतांना दोन आरोपी यांनी हातात कोयता व गुप्ती घेवुन त्याचा धाक दाखवुन फिर्यादीचे पान स्टॉलच्या गल्यातील दोन हजार रुपये बळजबरीने काढुन चोरुन नेले फिर्यादीवरुन एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि.नंबर ४७८/२०२३ भादवि ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे १) शुभम उर्फ छब्या रविंद्र गायकवाड रा.फोर्जिंग कॉलनी वडगाव गुप्ता शिवार ता.जि. अहमदनगर २)विश्वास गायकवाड रा.एमआयडीसी अहमदनगर यांनी केला आहे.त्यानुसार सपोनि/राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे विश्वास नामदेव गायकवाड रा.श्री स्टाईल चौक एमआयडीसी अहमदनगर यास शिताफीने पकडले.त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले.आरोपी विश्वास नामदेव गायकवाड याचेवर गंभीर स्वरूपाचे असे पाच गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई/योगेश चाहेर पोसई/पोना/संदीप चव्हाण,पोना/राजु सुद्रीक,पोना/नेहुल,पोना/विशाल थोरात,पोना/भागवत,पोकॉ/सचिन हरदास,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/उमेश शेरकर यांनी केली आहे.
