नगर प्रतिनिधी (दि.९ ऑगस्ट):-शहरातील केशर गुलाब मंगल कार्यालयात लावलेल्या कपड्यांच्या सेलमध्ये चोरी करणाऱ्या चार महिलांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सेल मधील एका स्टॉलमधून चोरी केलेले ५८ हजार रुपये किमतीचे कपडे हस्तगत केले आहे.मंगल कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून कोतवाली पोलिसांनी चार महिला आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतले आहे.केशर गुलाब मंगल कार्यालयात कपड्यांच्या सेलमध्ये लावलेल्या स्टॉल मधून कपड्यांची चोरी झाल्याची फिर्याद दि.५ ऑगस्ट २०२३ रोजी शुभम नागेश कोमाकुल (वय- २७ वर्षे, रा.माळीवाडा शिवम टॉकीज चौक अहमदनगर) यांनी दिली होती.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या.मंगल कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे नंदा इंगळे या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिने इतर तीन महिलांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.चोरी केलेले कपडे आरोपी महिलांच्या घरून हस्तगत करण्यात आले आहेत.पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकरी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोसई/ मनोज महाजन,पोहेकॉ/नितीन गाडगे,वसंत सोनवणे,पोना/ रविंद्र टकले,शाहीद सलीम शेख,प्रमोद लहारे,सुमीत गवळी, दिपक रोहकले तसेच सायबर सेल दक्षिण विभागाचे पोकॉ/ राहुल गुंडू यांनी ही कारवाई केली.
