अहमदनगर(दि.११ ऑगस्ट):-सोशल मीडियावरून दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होईल,अशा प्रकारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून, सीआरपीसी कलम १४९ नुसार सर्व सोशल मीडियावरील ग्रुपला नोटीस जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप,फेसबुक,इंस्टाग्राम यासारख्या कोणत्याही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजकंटकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे. सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत.शहरात सामाजिक शांतता रहावी,यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जात असून,दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर येत असलेले मेसेज,फोटो आणि मजकूर यावर कोणताही विश्वास ठेऊ नये,तसेच आलेले मेसेज समोर फॉरवर्ड करू नये.दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने कोणी आक्षेपार्ह मेसेज केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. व्हाट्सअप ग्रुपला ओन्ली ॲडमिन अशी सेटिंग करावी, जेणेकरून कोणत्याही अफवा असणारे मेसेज फॉरवर्ड होणार नाहीत. कोणत्याही ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास ग्रुप ॲडमिनसह सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नयेत कायदा हातात घेऊन कोणीही गैरप्रकार करू नये.कोणतेही चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नयेत.आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
