अहमदनगर (दि.१२ ऑगस्ट):-राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारु विक्री करणाऱ्या हॉटेलवर स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवून छापे टाकुन ३९,१५५ रुपये किमतीची देशी विदेशी दारु जप्त,करून एकूण सात आरोपीं विरुध्द राहुरी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारुबंदी कायदा ६५ (ई) प्रमाणे ०६ गुन्हे दाखल केले.

ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग,श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ/अतुल भानुदास लोटके,सिताराम गोसावी,पोना/रविंद्र आबासाहेब कर्डिले,संतोष राजेंद्र खैरे,गणेश प्रभाकर भिंगारदे,पोकॉ/रणजित पोपटराव जाधव,किशोर आबासाहेब शिरसाठ, बाळासाहेब अशोक गुंजाळ, पोकॉ/अरुण भिमराव मोरे यांनी केली आहे.
