नगर (दि.१३ ऑगस्ट):-पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्रजी कवाडे हे दि.१८ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून,त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश सहप्रवक्ते प्रा.जयंत गायकवाड यांनी दिली.प्रा.कवाडे हे दि.१८ रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे येतील.स.१०.३० वा.पक्षाचे ज्येष्ठनेते प्रा.भिमराव पगारे यांच्या मातोश्री यांचे निधन झाले असून त्यांच्या घरी सांत्वपर भेट देतील व नंतर पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उठाव या कार्यक्रमाचे उद्घाटन करुन त्याच ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करुन दुपारी २.३० वा.पत्रकार परिषद घेतील.यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत,अशी माहिती ज्येष्ठ नेते नितीन कसबेकर यांनी दिली.प्रा.जोगेंद्रजी कवाडे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे,नेते सोमा शिंदे,सचिव महेश भोसले,युवानेते विशाल गायकवाड,नितीन साळवे,शहराध्यक्ष किरण जाधव,नगर तालुकाध्यक्ष सुरेश वाघमारे,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संतोष मोकळ,नेवासा तालुका प्रमुख मधुकर पावसे,राहुरी तालुका प्रमुख अनिल पडघलमल,कर्जत तालुका प्रमुख महेंद्र साळवे,युवानेते कमलेश साळवे,पाथर्डी तालुका प्रमुख विलास गजभिव,शेवगाव तालुका प्रमुख संजय उन्हवणे,प्रदीप ससाणे आदि प्रयत्नशील आहेत.तरी या सर्व कार्यक्रमास पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन ज्येष्ठ नेते संपतराव भारुड यांनी केले आहे.