आरोग्यमंत्र्यांची माहिती १५ ऑगस्ट पासून सर्व सरकारी रुग्णालयात….
प्रतिनिधी (दि.१३ ऑगस्ट):-गोरगरीब जनतेसाठी नुकतीच एक दिलासादायक बातमी आली आहे.सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये गोरगरीब जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे.१५ ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा माेफत मिळणार आहे.स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टपासून सरकारी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला प्रत्येक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध होणार आहे,अशी माहिती राज्याचे आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.सरकारी रुग्णालयात सर्व सामान्यांना विविध चाचण्यांसाठी नाममात्र शुल्क आकारले जात हाेते.मात्र,सरकारने आता सामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.येत्या १५ ऑगस्टपासून सरकारी रुग्णालयात रुग्णांना लाभ घेता येणार आहे.आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निःशुल्क उपचार मिळावेत,यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सातत्याने खूप पाठपुरावा केला होता,अशी माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे