Maharashtra247

प्रवाशाला लुटणाऱ्या सराईत लुटारूला कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या;माळीवाडा बस स्थानकाजवळून केली अटक गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त

 

नगर (दि.१३ ऑगस्ट):- यवतमाळ येथील प्रवाशाला रिक्षात बसून घेऊन जाऊन आरणगाव रस्त्यावर दोन जणांनी मारहाण करून लुटले होते.

कोतवाली पोलिसांनी या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निष्पन्न करून माळीवाडा बस स्थानकाजवळून अटक केली. मोईन बादशहा शेख (वय २२ वर्षे, रा. मेहराब मशिदजवळ, मुकुंदनगर अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.प्रदिप दादाराव कदम (धंदा आचारी, रा.श्रीरामपुर ता.पुसद जि.यवतमाळ) हे ता.९ ऑगस्ट २०२३ रोजी वाईन्स समोरुन रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसले होते.रिक्षा चालकाने प्रदिप कदम यांना रेल्वे स्टेशनकडे न घेवुन जाता अरणागाव रोडवरील अजय पेट्रोलपंपाच्या दिशेने नेले.रिक्षा चालक व त्याचा मोटरसायकलवरील साथीदार या दोघांनी कदम यांना लोखंडी रॉडने मारहाण करत जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी फिर्यादी जवळील साडेचार हजार रुपये रोख व रियल मी कंपनीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला होता. कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपींना शोधून अटक करण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या. आरोपी मोईन बादशहा शेख व त्याचा साथीदार हे दोघे आरोपी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निष्पन्न झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मोईन शेख हा माळीवाडा बसस्थानक जवळ गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षातून येणार असल्याच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मपोसई मोरे करीत आहेत. मोईन बादशहा शेख हा सराईत आरोपी असून त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा एक, जबरी चोरीचे तीन, खुनाचा प्रयत्न प्रयत्न केल्याचा एक असे पाच गुन्हे दाखल आहेत.पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार तनवीर शेख,गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे,सलीम शेख,योगेश खामकर,रियाज इनामदार,अभय कदम,संदिप थोरात,अमोल गाडे,कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत,सुजय हिवाळे,अतुल काजळे, सागर मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

You cannot copy content of this page