अहमदनगर (दि.२१ ऑगस्ट):-एमआयडीसी परीसरात शेंडी चौक येथे पिकअपमधुन अवैध्यरित्या गोवंशीय जनावरांच्या मांसाची वाहतुक करणारे आरोपीना एमआयडीसी पोलिसांनी पकडले आहे.त्यांच्या ताब्यातून तब्बल ३०० किलो गोवंशीय जनावरांचे मांस असा एकुण ४,७८,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,अहमदनगर करुन औरंगाबाद रोडने एक पिकअप नबंर एम एच २० ई एल २३५६ हि येत असुन सदर पिकअपमध्ये गोवंशीय जनावरांचे मांस आहे.अशी माहिती मिळाल्याने सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन शेंडी बायपास रोड शेंडी चौक येथे सापळा लावला.व सदर पिकअपला ताब्यात घेतले. सदर पिकअपमधील चालकाला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) मोहमंद वसिम नसिम रा.गांधी पुतळयाजवळ छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले.तसेच त्याचे शेजारी बसलेल्या इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे २)पप्पु भाई रा.झेंडीगेट अहमदनगर ३) मोहम्मद साईद आलम वय ४२ रा.संभाजीनगर ४) बनारसी बाबु संगु हारी रा. गांधी पुतळयाजवळ संभाजी नगर असे सांगीतले त्यांना सदर पिकअप मध्ये काय आहे याबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.सदर पिकअपची झडती घेतली असता सदर पिकअप मध्ये ३०० किलो गोवंशीय जनावरांचे मासं मिळुन आले.तसेच एक पिकअप गाडी नंबर एम एच २० ई एल २३५६ असा एकुण ४,७८,०००/-रु किमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावरुन एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि. नंबर ७७१/२०२३ भादवि कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ ( ब ) ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोहेकॉ/रमेश थोरवे,पोहेकॉ/महमंद शेख,पोना/दिपक गांगर्डे,पोना/बंडू भागवत,पोना/राजेंद्र सुद्रीक,पोकॉ/भगवान वंजारी,पोकॉ/दहिफळे,पोकॉ/ज्ञानेश्वर तांदळे,पोकॉ/किशोर जाधव यांनी केली आहे.
