अहमदनगर (दि.२१ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी मंदिरांच्या ८ दानपेट्या फोडणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात तसेच शेजारील जिल्ह्यात जिल्ह्यातील मंदिरातील दानपेट्या या गुन्हेगारांनी फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील रेणुका माता मंदिराचे दरवाजाचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील 16 लाख 76 हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरीस गेले होते.या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात गुरन ८०९/२३ भादविक ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती.दरम्यान जिल्ह्यातील मंदिरांच्या दानपेट्या फोडणारी सराईत टोळी अहमदनगर सोलापूर रोडवरील तुक्कड ओढा येथील बंद पडलेल्या टोलनाक्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार टोल नाक्याजवळ सापळा लावला होता.लावलेल्या सापळा ठिकाणी आरोपी धनंजय काळे,भगवान परदेशी, अमोल पारे,राहुल लोदवाल हे आले असता त्यांना अटक करण्यात आली आहे.यामध्ये पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात तब्बल ८ मंदिरात चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यांच्या कडुन पोलिसांनी रोख रक्कम साठ हजार रुपये व दान पेटी फोडण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.यातील दोन आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत.या चौघां आरोपींवर एकूण३१ गुन्हे दाखल आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,पोसई/तुषार धाकराव,दत्तात्रय हिंगडे,विजय वेठेकर,देवेंद्र शेलार,पोना/रवींद्र कर्डिले,गणेश भिंगारदे,संदिप चव्हाण,आकाश काळे,अमोल कोतकर,भाऊसाहेब काळे,चापोना/भरत बुधवंत,चापोकॉ/अरुण मोरे यांनी केली आहे.
