अहमदनगर (दि.२९ ऑगस्ट):-नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांचे बेस्ट डिटेक्शन करून आरोपींना केलेली अटक, संवेदनशील परिस्थिती असताना सन उत्सवातील शांततेत पार पडलेल्या मिरवणुका आणि लोकाभिमुख काम करून पोलिस दलाची प्रतिष्ठा वाढविली, असे गौरवउद्गार विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कामाचे कौतुक करताना काढले.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गेल्या सहा महिन्यापूर्वी कोतवाली पोलीस ठाण्याची जबाबदारी चंद्रशेखर यादव यांच्यावर सोपविली.
कोतवाली पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून खाकीची जरब निर्माण केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची पोलीस दलातील आतापर्यंतची कारकीर्द अत्यंत धाडसी राहिलेली आहे. गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच पोलीस निरीक्षक यादव यांनी लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन जनसामान्यांमध्ये पोलीस दलाबद्दल आपुलकीची भावना निर्माण केली आहे. यास कामाची पावती म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी चंद्रशेखर यादव यांना अहमदनगर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी इतर अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्याबरोबर सन्मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस अमलदार उपस्थित होते.
