अहमदनगर (दि.२९ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यात दलितांवर अन्याय अत्याचार होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे नुकतीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून यामध्ये शेळी व कबुतरे चोरल्याच्या संशयावरून दलित कुटुंबातील मुलाला झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
यात काही आरोपींना अटक झाली असून परंतु जिल्ह्यात हे सत्र सुरूच आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे याची प्रशासनाने काळजी घ्यायला हवी.याच पार्श्वभूमीवर लॉंग मार्चचे प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर हे बुधवार ३० ऑगस्ट रोजी हरेगाव येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली.यावेळी प्रा.कवाडे यांच्या सोबत पक्षाचे प्रदेश सचिव प्रा.जयंत गायकवाड , महाराष्ट्र प्रदेश नेते नितीन कसबेकर,जिल्हानेते सोमा शिंदे,जिल्हा सचिव पत्रकार महेश भोसले,महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,युवानेते विशाल गायकवाड,शहर अध्यक्ष किरण जाधव आदी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.यावेळी सर्व कार्यकर्ते व भीमसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीरामपूर तालुका प्रमुख संतोष मोकळ यांनी केले.
