अहमदनगर (दि.३० ऑगस्ट):-श्रीरामपुर शहरातील महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधीत असलेला गुटखा,पानमसाला व सुगंधी तंबाखु विक्रेत्या विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन ४,१४,६९२/- रु.किंचा मुद्देमाल जप्त केला आहे.बातमीची हकीकत अशी की,
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपुर शहरात अवैध धंद्याची माहिती घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,श्रीरामपुर शहरातील नॉदर्न बँच,वार्ड नं ७, सदावतें हॉस्पीटलचे मागे इसम नामे भरत संघवी हा त्याचे घराचे पाठीमागील पत्र्याचे खोलीमध्ये गुटखा,पानमसाला,सुगंधी तंबाखु व सुपारी बेकायदेशिरपणे चोरुन विक्री करण्यासाठी ठेवलेले आहे. आता गेल्यास मिळुन येईल,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/दिनेश आहेर यांनी पथकास नमुद माहिती कळवुन पंच यांना सोबत घेवून बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.त्यानुसार पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी
जावुन खात्री केली असता त्या ठिकाणी एक इसम मिळुन आला त्यास पथकाची ओळख सागुन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव भरत ताराचंद संघवी रा. मोरगेवस्ती,वार्ड नं ७, श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले.बातमी प्रमाणे पथकाने त्याचे घराजवळील त्याचे मालकीच्या बंद पत्र्याचे रुमची झडती घेता १,४३,७४८/- रुपये किंमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला, ७,७४४/- रुपये किंमतीचा
व्ही १ तंबाखु चे एकुण ३५२ पुडे, १,०२,२४०/- रुपये किंमतीचा हिरा पानमसालाचे ८५२ पुडे, २६५५०/रु किंमतीची रॉयल७१७ तंबाखुचे ८८५ पुडे, ६२०८०/-रु किं चा राजनिवास पानमसालाचे ४८५ पुडेस १,५६०/- रु किं चे प्रिमीयम जेड एल-०१ जाफरानी जर्दा तंबाखु चे ५२ पुढे, १०५०/-रु किं चा गोवा गुटखा पुडे,२४,६००/-रु किंचे रजनीगंधा पानमसाला कंपनीचे बॉक्स,१२०/- रु किंचा एम तंबाखु पुडे, ३६००० असा एकुण ४,१४,६९२/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.सदर ताब्यात घेतलेला इसम भरत ताराचंद संघवी हा एकुण ४,१४,६९२/- रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात विक्रीस व तयार करणेस बंदी असलेला विविध प्रकारचा पान मसाला,गुटखा,सुंगधी तंबाखु असे अवैध रित्या कब्जात बाळगतांना व विक्री करताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेलनला गु.र.नं. ९२२/२०२३ भादविक ३२८,२७२, २७३, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.ही कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती स्वाती.भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर,श्री.बसवंत शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/२१४५ मनोहर सिताराम गोसावी,पोहेकॉ/१७३३ अतुल भानुदास लोटके,पोना/१२९३ गणेश प्रभाकर भिंगारदे,पोना/१८५ ज्ञानेश्वर नामदेव शिंदे,पोना/६५८ संदीप संजय दरंदले यांनी केलेली आहे.
