
अहमदनगर (दि.३० ऑगस्ट):-घातपात करण्याच्या उद्देशाने स्वतच्या घरात दोन तलवारी लपवुन ठेवणा-या तरुणास तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की,दि.30 ऑगस्ट रोजी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,रामवाडी, तांबोळी मस्जिद जवळ राहणारा आकाश शंकर मामड्याल याच्या घरात आगामी काळात येणा-या सणोत्सवाच्या दरम्यान काही तरी अनुचित प्रकार करण्याच्या हेतुने घरात दोन तलवार लपवुन ठेवल्या आहे.आत्ता गेल्यास तो मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक साळवे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांना नमूद बातमीतील ठिकाणी कारवाई करण्यास सांगितले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अचानक छापा टाकला असता एक इसम संशईत हालचाली करताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश शंकर मामड्याल रा.रामवाडी, सर्जेपुरा,ता.जि.अहमदनगर असे सांगितले.त्याच्या राहत्या घराची दोन पंचासमक्ष घरझडती घेतली असता त्याच्या घरामध्ये लाकडी दिवानाखाली 1600/- रु किं.च्या दोन तलवारी मिळुन आल्याने पुढील कारवाई कामी जप्त करण्यात आल्या आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अनिल कातकडे,पोलीस निरीक्षक तोफखाना पो.स्टेश्री.मधुकर साळवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि.सचिन रणशेवरे,पोकॉ/शिरीष तरटे,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,अतुल कोतकर,सतीश त्रिभुवन,सतिष भवर,संदिप गि-हे सर्व यांनी केली आहे.