अहमदनगर (दि.३१ ऑगस्ट):-लाच मागणी गुन्हा अहवाल*
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- 28 वर्ष,रा जकाते वस्ती, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर
▶️ *आरोपी*
१) आलोसे आकाश नारायण काशीकेदार, तलाठी सजा पेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-* 2,00,000/-₹ *तडजोडी अंती* 1,50,000/-₹
▶️ *लाचेची मागणी दिनांक-* ता.11/07/2023
▶️ *लाचेचे कारण* – तक्रारदार यांनी त्यांच्या मित्राकडून तोंडी भाडेतत्त्वावर पोकलेन मशिन कामा करीता घेतला होता. सदरचा पोकलेन दि.11/7/2023 रोजी रात्री 01.00 वा. पेडगाव येथील तक्रारदार यांच्या परिचयाचे इसम यांच्या शेतात लावलेला असताना पेडगावचे तलाठी श्री काशी केदार व सर्कल डहाळे हे सदर पोकलेन लावले ठिकाणी आले व तक्रारदार यांना तुम्ही सदरचा पोकलेन वाळू उपसा करणेकरिता वापरत असल्याचे सांगून तक्रारदार यांना तुमच्या पोकलेन वर केस व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी 3,00,000/-रु. आम्हाला द्यावे लागतील असे म्हणाले व दिनांक 11/7/2023 रोजी सकाळी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे तक्रारदार यांना भेटण्यास बोलवले. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे त्यांची लाच मागणीची वरील प्रमाणे तक्रार नोंदवली. त्यानुसार दिनांक 11/07/2023 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी कारवाई दरम्यान यातील आलोसे काशीकेदार,तलाठी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 2,00,000/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1,50,000/-₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम टप्प्या टप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक 31/08/2023 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
▶️ हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा अधिकारी*:-
राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर मो नंबर-: 9420896263
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर मो. नंबर :- 8007679900,
▶️ *सापळा पथक** -पोलीस हवालदार शिंदे,पोलीस अंमलदार वैभव पांढरे,बाबासाहेब कराड चालक- हारून शेख, दशरथ लाड,
▶️ **मार्गदर्शक* -*मा.शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, मो. नंबर- 9371957391,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶️मा. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, मो. नंबर-
9404333049 ला.प्र.वि नाशिक.
▶️ श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, मो. नंबर 9822627288,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ **आरोपीचे सक्षम अधिकारी -* मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर
