अहमदनगर (दि.३१ ऑगस्ट):-नगर मनमाड हायवे रोडवर रोड रॉबरी करणारे चार सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून एक लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.
बातमीतील हकीकत आशिकी,दि. १० जुलै २०२३ रोजी फिर्यादी नामे अनिल मोहन म्हस्के धंदा खाजगी नोकरी रा देहरे ता. जि.अहमदनगर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की,दि. ०९/०७/२०२३ रोजी रात्री ०९/०० वाचे सुमारास विळद पाण्याची टाकी जवळ देहरे गावचे शिवारात फिर्यादी हे मोटारसायकलवरुन जात असतांना त्यांचे पाठीमागुन चार अनोळखी इसम मोटारसायकलवर आले व फिर्यादीला मोटारसायकल आडवी लावुन त्यांना थांबवुन आमचेकडे गोणीमध्ये तलवार आहे.
तुला जिवंत मारु अशी धमकी देवून फिर्यादी यांचे कडुन त्यांची एक लाख रु. किमतीची एमहा कंपनीची आर १५ मोटारसायकल नंबर एम एच १६ सी पी ६८८४ व १०,०००/- रु किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल असा एकुण १,१०,००० रु. किमतीचा मुददेमाल बळजबरीने चोरुन नेला आहे त्यावरुन गुरन ६०७/२०२३ भादवि कलम ३९२,३४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाचा समांतर तपास करत असताना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,
सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे १)नागेश संजय चव्हाण रा.मोबीन आखाडा राहुरी जि.अहमदनगर २) अक्षय उत्तम माळी रा. झोपडपटटी राहुरी ३)संकेत उर्फ सनी सोपान बड़े रा. झोपडपटटी राहूरी जि. अहमदनगर ४) किरण उर्फ हुंगा राजेंद्र जगधने रा.झोपडपटटी राहुरी यांनी केला असुन ते राहुरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि/राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना राहुरी येथे पाठविले.या पोलीस पथकांनी राहुरी येथुन सदर आरोपींना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले.आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचे कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेली एक लाख रु. किमतीची एमहा कंपनीची आर १५ मोटारसायकल व १०,०००/- रु.किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल असा एकुण १,१०,००० रु. किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.सदरचे आरोपी हे सराईत असुन त्यांचेवर राहुरी व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई/चांगदेव हंडाळ,पोना/संदिप चव्हाण, पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/गजानन गायकवाड,पोकॉ/ नवनाथ दहिफळे,होम/अक्षय खेसे,होम/पडवळे तसेच मोबाईल सेलचे मपोना/रिंकु मढेकर,पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली आहे.
