अहमदनगर (दि.३१ ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्याचे मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या युवकास जिल्ह्यातील शेवगाव मधून पोलिसांनी अटक केली.
धमकीचा फोन हा अहमदनगर मधून केला गेला असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.या तरुणाचे नाव बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे असे आहे.ही व्यक्ती स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करीत आहे.ही परीक्षा सुरळीत रित्या व स्वच्छ पारदर्शक व्हावी या उद्देशाने त्याने मंत्रालयामध्ये फोन केला असल्याचे सांगितलेले आहे.
त्यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचे सांगितले.मात्र फोन वरील व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली”,असे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.
