शहर वाहतुक शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्नेहालय येथील अनाथ मुलींकडुन राखी बांधुन रक्षाबंधन केले साजरे
अहमदनगर (दि.२ सप्टेंबर):-भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन,शहर वाहतुक शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आज दि.२ सप्टेंबर रोजी अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरे केले.
अहमदनगर शहरातील स्नेहालय संचलित डॉ.कलाम बालभवन प्रकल्प (सिध्दार्थनगर) येथील अनाथ मुलींकडुन शहर वाहतुक शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधुन रक्षाबंधन साजरे करण्यात आले.स्नेहालय संचलित डॉ.कलाम बालभवन प्रकल्प (सिध्दार्थनगर) येथील सौ.विणा मॅडम व मुलांचे शिक्षक श्री.प्रदिप भोसले सर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.यावेळी शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.मोरेश्वर पेन्दाम, पोउनि/पाटोळे,पोउनि/ गायकवाड व शहर वाहतुक शाखा नेमणुकीतील पोलीस अंमलदार हजर होते.
शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.मोरेश्वर पेन्दाम यांनी यावेळी स्नेहालय संचलित डॉ. कलाम बालभवन प्रकल्प (सिध्दार्थनगर) येथील मुलींना रक्षाबंधन या सणाचे महत्व समजावून सांगुन रक्षाबंधनाचा सण कसा अस्तित्वात आला बाबाबत माहीती दिली.तसेच स्त्री अत्याचाराबाबत प्रबोधन करुन भविष्यात पोलीसांची मदत हवी असल्यास २४ तास कधीही फोन करा तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याच प्रमाणे स्नेहालय येथील काही विदयार्थ्यांनी पोलीस भरतीबाबत मुद्दा उपस्थित केल्याने त्यांना पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असल्यास योग्य ते मार्गदर्शन व मदत करण्याचेही आश्वासन दिले.यावेळी शिक्षक श्री. प्रदिप भोसले सर यांनी वाहतुक पोलीसांचे आभार मानले.या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित अनाथ मुलांचे चेहऱ्यावर मोठया प्रमाणात आनंद दिसुन आला.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक व श्री. अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेन्दाम, स्नेहालय संचलित डॉ.कलाम बालभवन प्रकल्प (सिध्दार्थनगर) येथील सौ. विणा मॅडम,शिक्षक श्री.प्रदिप भोसले सर यांनी केले.