Maharashtra247

शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा दुचाकीचा भीषण अपघात एक ठार तर एक जखमी

 

अहमदनगर (दि.३ सप्टेंबर):-अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर आज दि.३ सप्टेंबर रोजी सकाळीच पुन्हा एकदा दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.

या अपघातात एक जण झाला मरण पावला असून त्याला दुचाकी वाहनाचा वेग प्रचंड असल्यामुळे वाहन नियंत्रित करता आले नाही. त्यामुळे हा अपघात झाला. स्टेट बँक चौक ते चांदणी चौक दरम्यान असलेल्या सेल्स टॅक्स विभागाच्या कार्यालयासमोर सकाळी हा अपघात झाला.या अपघातात पती-पत्नी हे त्यांच्या दुचाकीवरून संभाजीनगरहून पुण्याकडे जात होते.

त्यांच्या वाहनाचा वेग खूप असल्यामुळे त्यांना ते वाहन नियंत्रित करता आले नाही. उड्डाणनपुलाच्या वळणावर वाहन कठड्याला घसरून दुचाकी चालक पुलावरून खाली पडला तर त्याची पत्नी जखमी झाली.तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.या अपघाताची माहिती समजताच स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.दरम्यान, या अपघातात अत्यवस्थ झालेला दुचाकी चालक जागेवरच गतप्राण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या मयत दुचाकी चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या पुलावरची अपघाताची मालिका अजूनही संपता संपेना अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती.

You cannot copy content of this page