पाथर्डी प्रतिनिधी (३ सप्टेंबर):-तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथे जिल्हा परिषद अहमदनगर आणि कोड टू इन्हांस लर्निंग ट्रस्ट यांच्या मार्फत कोड ऑन व्हील्स या प्रकल्पाची दोन दिवसाची कार्यशाळा राबविण्यात आली.
विद्यार्थांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच लॅपटॉप हातात घेतला आणि नाविन्यपूर्ण समस्या घेऊन प्रोजेक्ट बनविले,विद्यार्थ्यांची हि मेहनत पाहून आणि त्यांचा त्याबद्दलचा उत्साह पाहून असे वाटत आहे की विद्यार्थांना हे ज्ञान घेण्याची खूप उत्सुकता आणि गरज आधीपासून होती,त्यामुळे विद्यार्थांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊन भागणार नाही तर त्याच सोबत नवीन तंत्रज्ञाना बद्दल महिती असणे सुध्दा महत्वाचे आहे,असे प्रासंगिक मनोगत कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी मुख्याध्यापक भास्कर दराडे सर यांनी केले.दोन दिवसाचा हा कार्यक्रम खूप सर्जनशील,नियोजित आणि उत्तम होता.
या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रिंटिंग आणि अलेक्सा सारख्या गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता खूपच वाढीस लागली या कार्यशाळेत विद्यार्थांना खूप गमतीशीर आणि हसत खेळत स्क्रॅच या अॅप्लिकेशन वर कोडिंग,3d प्रिंटर आणि एलेक्सा या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.
विद्यार्थांना लॅपटॉप सरावास देऊन त्यांना ग्रुप नुसार समाजातील काही समस्या ओळखून,ती समस्या कोडिंगद्वारे सोडवायला सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये “Observe Brainstorm Code Pitch” या अध्यापनशास्त्र पद्धतीचा अभिनव अवलंब केला.दूषित पाणी,वृक्षतोड, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,वृक्षारोपण आणि खराब रस्त्यामुळे होणारे अपघात या विषयावर त्यांनी लक्षवेधी प्रोजेक्ट बनवून सादर केले.या प्रसंगी विद्यार्थांनी अमेझोन एलेक्साला सामान्यज्ञानचे प्रश्न विचारले आणि एलेक्साने गंमतीदारपणे अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.
कृत्रिम बुद्धिमत्ता कशी कार्य करते हे यातून विद्यार्थ्यांना अभ्यासास मिळाले.विद्यार्थ्यांचा हा उत्साह पाहून आणि त्यांनी बनवलेली प्रोजेक्ट पाहून शिक्षकांनी,पालकांनी आणि ग्रामपंचायत समितीचे सदस्य तसेच शालेय व्यवसथापन समितीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील श्री.परमेश्वर वाघमारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.या कार्यशाळेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) अधिव्याख्याता श्री. मुकुंद दहिफळे सर, ग्रामपंचायत समितीचे सदस्य रघुनाथ शिरसाट,श्री. संपतराव दराडे,श्री.किसन ज्ञानदेव शिरसाट,शिक्षकवर्ग, मुख्याध्यापक श्री.भास्कर दराडे,शिक्षिका श्रीमती.अनिता गायकवाड,श्रीमती. गीता गवळे,श्रीमती.मंगला खेडकर,श्री.संतोष गिरी, पालकवर्ग आणि शिक्षणप्रेमी तरुणवर्ग यांनी या उपक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशासाठी कोड ऑन व्हील्स प्रकल्पाच्या कार्यक्रम सहाय्यक प्रिती मॅडम आणि गाडीचे चालक रमेश बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
