श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.६ सप्टेंबर):-पुण्यश्लोक आहिल्यादेवी माध्यमिक विद्यालय नायगाव शाळेत ५ सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
या दिवशी संपूर्ण दिवसभर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य केले. शिक्षक मुख्याध्यापक म्हणून इयत्ता दहावीची अमृता गोरे या विद्यार्थिनीने कामकाज पाहिले तसेच शिपाई मामाचे काम ऋत्विक आदमने यांनी केले.
यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा आभाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षक पंडित तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लबडे सर यांनी केले व आभार श्री.इनामदार सर व मुन्तोडे सर यांनी केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला व सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बोर्डे व कु.दातीर या विद्यार्थिनींनी केले.
