मुंबई प्रतिनिधी (दि.७ सप्टेंबर):-मानखुर्द येथील पीईएमजी कॉलनी जवळील अवैध लॉटरीचे दुकान खुलेआम सुरू असून याच लॉटरीच्या दुकानाच्या बाहेर लॉटरी खेळणारी जुगारी रस्त्यावरच दारू पीत उभे असतात.
यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या महिला भगिनींना या गोष्टींचा त्रास होतो व हे टारगट लोक महिलांची छेड ही काढत असतात.
या अवैध लॉटरी दुकानाची गेल्या दोन वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य उपाध्यक्षा वर्षा कांबळे यांनी कायम तक्रार करत पोलिसांना या अवैध लॉटरी सेंटरची माहिती दिली परंतु अद्यापही या लॉटरी सेंटरवर कारवाई झाली नाही.या लॉटरी सेंटरला अभय नेमकी कुणाचे? याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.मुंबई पोलीस कमिशनर यांना वर्षा कांबळे यांनी नुकतीच तक्रार करून म्हटले आहे की दोन वर्षापासून सतत तक्रार करत आहे बघूया आता तरी काय कायदेशीर कारवाई होतीय.
