संगमनेर प्रतिनिधी (दि.१९. डिसेंबर):-संगमनेर शहरात चोरट्यांनी सशस्त्र धुमाकूळ घालत तीन घरे फोडून १५ तोळे सोन्याच्या दागिन्यासह दीड लाख रुपये असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना रविवारी १८ डिसेंबर रोजी पहाटे शहरालगतच्या सुकेवाडी परिसरात घडली.चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एक महिला जखमी झाली आहे.
दरोड्याच्या या घटनेमुळे शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवारी रात्री पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी सुकेवाडी गावचे उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीवर दरोडा टाकला.या दरोडेखोरांनी चाकू,लोखंडी टामी, पाईप अशा शस्त्रांचा धाक दाखविला.दरोडेखोरांनी शेजारील इतर घरांचे दरवाजे बाहेरून बंद करीत लुटमार केली.या दरोड्यामध्ये तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून चोरट्यांनी पलायन केले.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
