
संगमनेर दत्तात्रय घोलप/राजेंद्र मेढे (दि.२६ सप्टेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी जुन्या घाटामध्ये गणपती मंदिराच्या पाठीमागे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
रविवारी (दि.२४ सप्टेंबर) रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. आता या अल्पवयीन मुलीची ओळख पटविण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे.पोलिसांच्या हाती सीसीटीव्हीचे फुटेज आल्याचे समोर आले आहे.ही मुलगी संगमनेर शहरातील एका उपनगरातील आहे.यामुळे तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,जुन्या चंदनापुरी घाटातील गणपती मंदिराच्या पाठीमागे मुलीचा मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलिसांना समजली होती.माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे,सहायक पोलीस निरीक्षक इस्माईल शेख,पोलीस उपनिरीक्षक सातपुते,पोहेकॉ/अमित महाजन,अजय आठरे यांसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.मुलीचा खून केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तसेच मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले होते.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने तपास सुरू केला.यामध्ये काही सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या अल्पवयीन मुलीची ओळख पटली असून ती संगमनेरातील एका उपनगरात राहत होती.अज्ञात इसमाने तिचे डोक्यात दगड घालून खून केला.याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुरनं 633/ 2023 भादंविक 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे हे करत आहे.