Maharashtra247

एकविरा चौकात अपघातात तरुण जागीच ठार

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२०.डिसेंबर):-शहरातील उपनगरातील गजबजलेल्या एकविरा चौकात आज सकाळी २० डिसेंबर रोजी अपघात झाल्याने मिलिंद सतीश डहाळे (वय ३५,वर्ष रा. गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.त्यांचे चुलत बंधू अमित डहाळे यांनी हा अपघात झाल्यानंतर त्यांना खाजगी ॲम्बुलन्सने सिविल हॉस्पिटल येथे औषध उपचारसाठी दाखल केले असता ते त्यापूर्वीच मयत झाले.तोफखाना पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

You cannot copy content of this page