Maharashtra247

फोपसंडी येथे संगमनेरातील दोन पर्यटक बुडाले.. शोध कार्य सुरु..!!

संगमनेर/दत्तात्रय घोलप:-अहमदनगर जिल्ह्यातील फोफसंडी गावात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चार तरूणांपैकी दोघेजण पाण्यात बुडाले आहेत.गावकरी आणी पोलीस प्रशासनाने दोघांचा शोध सुरू केला असून अजूनही त्यांचा शोध लागला नाही.

सविस्तर वृत्त असे की अकोले तालुक्यातील फोफसंडी गाव हे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे.याचा आनंद घेण्यासाठी संगमनेर तालुक्यातील कनोली गावातील चार तरूण शुक्रवारी गावात पोहचले आणी दरीखो-या फिरत असताना एका धबधब्याजवळ पोहचले.यावेळी एका तरूणाचा मोबाईल पाण्यात पडला म्हणुन तो काढण्यासाठी खाली उतरला मात्र त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणी त्याला वाचवण्यासाठी दुसर्‍या तरूणाने पाण्यात उडी घेतली मात्र दुर्दैवाने दोघेही खोल पाण्यात बुडाले.अतिदुर्गम भाग असल्याने इथे मोबाईलला नेटवर्कही नाही त्यामुळे मदतीसाठी इतर त्यांचे सोबती असणारे दोघे तरूण गावात धावत आले आणी नागरीकांच्या मदतीने शोध सुरू केला मात्र रात्री उशिरापर्यंतही त्यांचा शोध लागला नाही.

रात्र झाल्याने शोध कार्य थांबवले गेले.संगमनेर तालुक्यातील कनोली येथील अभिजीत वरपे आणी पंकज पाळंदे असे या बुडालेल्या दोघांचे नाव असून राजूर पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी पोहचले होते.या परीसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने शोध कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. सदर घटनेची माहिती देताना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी अधिक सांगितले.

You cannot copy content of this page