
पाथर्डी (विठ्ठल आंधळे):-विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच गावचा सर्वांगीण विकास स्वच्छ निर्मळ व निस्वार्थपणाने ज्ञान घेऊन नेहमी समाजाला गर्व वाटेल असे कार्य आपल्या आयुष्यात करावेत.
व नेहमी शांततेत व अहिंसेने आपले प्रश्न सोडवावे असे मनोगत गावातील ज्येष्ठ शिक्षक श्री.पांडुरंग आंधळे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त व्यक्त केले.कै.आप्पासाहेब आंधळे त्यांच्या स्मरणार्थ जिरेवाडी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी लेझीम स्पोर्ट ड्रेस वाटप करण्यात आले.
श्री.नवनाथ माधवराव आंधळे यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ जो काही शाळेला ड्रेस वाटप करण्याचा कार्यक्रम निर्णय घेतला.त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती जिरेवाडी,यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने अतुल आंधळे यांनी आमच्या कुटुंबाच्या वतीने शाळेला नेहमीच सहकार्य राहील असे सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. नवनाथ आंधळे यांनी स्वीकारले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिरेवाडी शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले श्री साळुंखे सर यांनी केले.या कार्यक्रमास सरपंच श्री.मुकुंद आंधळे, श्री.विठ्ठल आंधळे गुरुजी,ग्रामपंचायत सदस्य श्री.नारायण साहेब आंधळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बंडू आंधळे, उपाध्यक्ष विठ्ठल आंधळे, आंधळे,उपसरपंच राजेंद्र बडे,प्रकाश आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.