
अहमदनगर (दि.२ ऑक्टोबर):-पाथर्डी तालुक्यात व अहमदनगर शहर परिसरात दिवसा घरफोडी करणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

फिर्यादी श्री.सोमनाथ म्हातारदेव घुले रा.शेकटे,ता. पाथर्डी हे दि.27 सप्टेंबर रोजी घरा बाहेर गेले असताना अनोळखी आरोपींनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन 70,000/- रुपये किंमतीचे मनी मंगळसुत्र व रोख रक्कम चोरुन नेली होती याबाबत पाथर्डी पो.स्टे.गु.र.नं.1006/23 भादविक 454,380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही घरफोडीची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेवुन मिळुन आल्यास कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.पथक चिचोंडी पाटील,ता.नगर परिसरात रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना काही संशयीत इसम पोलीस पथकास पाहुन पळु लागले पथकाने संशयीतांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) रोहित नादर चव्हाण रा.चिचोंडी पाटील,ता.नगर व 2 विधीसंघर्षीत बालक असे सांगितले.त्यांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली त्या बाबत विचारपुस करता आरोपी नामे रोहित चव्हाण याने अल्पवयीन साथीदारासह शेकटे,पाथर्डी व अहमदनगर शहरातील सावेडी नाका येथे बंद घराचे कुलूप तोडुन चोरी केल्याची कबुली दिली.आरोपी नामे रोहित नादर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर,बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न,दरोडा,जबरी चोरी,घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण-7 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व श्री.सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात,सफौ/भाऊसाहेब काळे,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,संतोष खैरे,पोकॉ/भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर,प्रशांत राठोड व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांनी केली आहे.