
पारनेर (ॲड.प्रविण तांबे):-पारनेर तालुक्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 154 जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मॉडेल व्हिलेज ग्रामपंचायत गोरेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला गोरेगागावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सुमनताई बाबासाहेब तांबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी जयंती निमित्त काल येथे १ ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहिम राबवली.तसेच स्वच्छते बाबत शप्पत घेण्यात आली.या वेळी लोकनियुक्त सरपंच सुमनताई तांबे,उपसरपंच अण्णासाहेब पाटील नरसाळे,सदस्य चौरे विकास काकडे,संदिप तांबे, भाऊसाहेब तांबे,साहेबराव नरसाळे,तसेच ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.