
अहमदनगर (दि.१४ ऑक्टोबर):-नगर-मनमाड रोडच्या बाजूस एका बंगल्यामध्ये रिलॅक्स स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे.अशी खात्रीशिर बातमी डीवायएसपी संदिप मिटके यांना मिळाल्याने दि.१३ ऑक्टोबर रोजी सदर ठिकाणी पथकातील पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली.
आणि अमोल भीमा भोसले (रा.श्रीरामनगर शिर्डी ता.राहाता) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून स्पा सेंटर चालक गणेश कानडे हा फरार झालेला आहे.आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक,स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके,पीआय/सोपान शिरसाठ,एपीआय/योगिता कोकाटे,हेकॉ/इरफान शेख,पोना/अशोक शिंदे,पोना/बाबा खेडकर,मपोना/वंदना वाकचौरे,पोना/श्याम जाधव,पोकॉ/दिनेश कांबळे, चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे.