
अहमदनगर (दि.१४ ऑक्टोबर):-मनोज जरांगे पाटील यांचे सभेमध्ये १०,९५,०००/- रुपये किमतीचा सोन्याचे दागिने चोरी करणारा अट्टल गुन्हेगारला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की, दि.०८ ऑक्टोबर २०२३ रोजी फिर्यादी किशोर चांगदेव दंडवते (रा.साकुरी,ता.राहाता, जि.अहमदनगर) हे साकुरी येथील विरभद्र मंदीरासमोर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकरीता गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे पेंडल असा एकुण १०,९५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.या घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलीस ठाणे गु.र.नं.५१९/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे अनोळखी चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमुण गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना करून पथक तात्काळ रवाना केले.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा ठिकाणचे आजुबाजुस असलेले सी.सी.टी.व्ही.फुटेज संकलित करुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत आरोपीची माहिती काढत असतांना पोनि.श्री.दिनेश आहेर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार इसम नामे अमोल बाबासाहेब गिते (रा.लोहसर खांडगांव,ता.पाथर्डी,हल्ली रा. आगसखांड,ता.पाथर्डी) यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये गुन्ह्यातील गेले मालापैकी १,२५,०००/- रुपये किमतीची अंदाजे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची तुटलेली चैन मिळुन आली. मिळुन आलेल्या इसमास अधिक विश्वासात घेवुन चोरीचे वेळी असलेल्या त्याचे इतर साथीदाराबाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नामे १)नविन माने पुर्ण नांव माहित नाही रा.भिंगार,ता.जि.अहमदनगर (फरार) २) संदीप झिंजवडे पुर्ण नांव माहित नाही, रा. पाथर्डी (फरार) यांचे सोबत चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/बापुसाहेब फोलाने,दत्तात्रय हिंगडे,दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, पोना/रविंद्र कर्डिले,पोना/भिमराज खसे,पोना/संतोष खैरे,पोना/संदीप चव्हाण,फुरकान शेख,पोकॉ/अमोल कोतकर,पोकॉ/अमृत आढाव,पोकॉ/प्रशांत राठोड, चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे.