
अहमदनगर (दि.३ नोव्हेंबर):-दि.३ नोव्हेंबर रोजी १२.०० वाजता कोतवाली पोलिस आणि अहमदनगर महानगरपालिका यांनी प्राप्त तक्रारीवरून शाळेच्या कंपाउंड बाहेर असलेले अतिक्रमण तात्काळ काढले.
या अतिक्रमणामुळे शाळेचा दैनंदिन कामकाजात व्यत्यय येत होता तसेच वाहतुकीस अडथळा होत होता याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.त्यावरून आज रोजी ही कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे, पोलीस हवालदार योगेश खामकर,सतीश भांड,सतीश शिंदे, किशोर वाघ,अंजली गुरवे,हिनाबी बागवान,रोहिणी मंडलिक,श्वेता पर्मासागर आणि महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकरक्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे व अतिक्रमण पथकातील योगेश बल्लाळ,राहुल तनपुरे ,जपकर,शिवाजी गाढवे,आरेकर, तुकाराम नरवडे सहभागी होते.