अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश;संगमनेरच्या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या
संगमनेर (राजेंद्र मेढे):-अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले असून, पोलिस पथकाने आरोपीला ठोकल्या आहेत.गणेश भाऊसाहेब चव्हाण (रा. पेमगिरी,ता.संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दोन वर्षानंतर अल्पवयीन मुलीचा शोध लागला आहे.गणेश चव्हाण याने १९ मार्च २०२१ रोजी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते.या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.मानवी वाहतूक पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लावून आरोपीला गजाआड केले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,उपअधीक्षक कमलाकर जाधव,पोलिस उपअधीक्षक (गृह) हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. बाळासाहेब शिंदे,मपोसई. प्रियांका आठरे,पोहेकॉ. समीर सय्यद, मपोहेकॉ. अनिता पवार, मपोकॉ.छाया रांधवन, पोकॉ.काळे यांनी केली आहे.