तक्षिला स्कूलचे वार्षिक क्रीड़ा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांची उपस्थिती
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३.डिसेंबर):-तक्षिला स्कूलचा वार्षिक क्रीड़ा महोत्सव प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली व भाग्यश्री बिले जिल्हा क्रीड़ा अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बिले मॅडम यांनी खेळाडूंना तसेच पालकांना उत्कृष्ट मार्गदर्शन करत स्वतःचा खडतर असा प्रवास सांगितला,सध्याच्या युगात पालक आपल्या मुलांची काळजी करतात व नवनवीन संधीसाठी सर्वतोपरी प्रयत्नही करतात,पण क्रिडा क्षेत्रात सुद्धा खूप मोठ मोठ्या संधी आहेत त्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे ही नमूद केले.या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची प्राथमिक सुरवात स्वागतगीत व सांस्कृतिक नृत्य यांनी झाली, तसेच परेड करत विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर विराजमान अतिथी पाहुण्यांना मानवंदना दिली.मनोरंजक क्रिडा प्रकारा मध्ये बॉल ड्रीबल,स्कीपिंग,शटल,सॅक रेस,स्लो सायकलिंग,बैटन रीले या क्रिडा प्रकारांची स्पर्धा घेण्यात आली,या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले,मोर नृत्य, लेझीम डाव,ढोल पथक, योगासन, लाठी-काठी,आदी कार्यक्रमांनी उपस्थिताची मने जिंकली,विजयी विद्यार्थी व पालक यांना सन्मान चिन्ह, पदक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.राष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंना विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले,शाळेचा वार्षिक अहवाल प्राचार्या मेहेत्रे मॅडम यांनी वाचून दाखविला,मुलांना प्रोत्साहित करने ही तक्षिला स्कूलची परंपरा असून,विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे हे आमचे आद्य कर्तव्य असल्याचे प्राचार्या यांनी व्यक्त केले,इथेच न थांबता आगामी काळात अंतर्राष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू घडविण्याचा मानस असल्याचे नमूद केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक वृंद व कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.