Maharashtra247

राहुरी पोलीस ठाण्यात दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

नगर प्रतिनिधी (दि.२४. डिसेंबर):-राहुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तडकाफडकी अहमदनगर येथील मुख्यालयात दि.२३ डिसेंबर रोजी बदली करण्यात आली.या घटनेच्या निषेधार्थ २३ डिसेंबर रोजीच दुपारी चार वाजेच्या दरम्यान पिंटू साळवे व सचिन साळवे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःच्या अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतून आत्मदहनचा प्रयत्न केला आहे.या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी राहुरी तालुका हद्दीत अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद केले होते.त्यांचे कामकाज हे उल्लेखनीय असून अशा अधिकाऱ्याची राहुरी तालुक्याला नितांत गरज आहे.त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी.ही मागणी आता तालुक्यात जोर दारू लागली आहे.दराडे यांची बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पिंटू साळवे व सचिन साळवे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page