अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस क्रीडा विभागाच्या उपाध्यक्षपदी क्रिडाशिक्षक प्रदिप पाटोळे यांची निवड
नगर प्रतिनिधी (दि.२४.डिसेंबर):-नुकत्याच कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत,काँग्रेस पक्षाच्या वतीने नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने व शहर जिल्हाअध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस क्रीडा विभागाची स्थापना करण्यात आली,व कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.या वेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. क्रिडाशिक्षक प्रदिप सुंदर पाटोळे यांची अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेस क्रिडा विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करणयात आली,प्रदिप पाटोळे हे क्रीडा क्षेत्रात गेल्या २० वर्षापासून कार्यरत आहेत,तसेच स्केटींग खेळाची नगरमध्ये १९९८ मध्ये टीम टॉपर्स स्केटींग ऑकेडमीच्या माध्यमातून सुरूवात शहरात प्रथमच प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली,शालेय राष्ट्रीय, सिबिएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये नगरचा नावलैकिक करणारे हे पहिले प्रशिक्षक ठरले,तसेच रोलबॉल क्रीडा प्रकारात शालेय, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नगरचे नावलैकिक केले.जिल्हा रोलबॉल संघटनेचे संस्थापक सचिव असुन अनेक खेळाडु घडविण्यात मोलाचे योगदान दिले व अनेक स्पर्धांचे आयोजन करुन खेलाडुना एक उत्कृष्ट व्यासपिठ निर्माण करुन दिले.