महिला सरपंच व पतीसह ग्रामपंचायत कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात चाळीस हजार रुपयांची घेतली लाच
अहमदनगर (दि.२३ नोव्हेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील महिला सरपंच व तिच्या पतीला व एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला चाळीस हजार रुपयांची लाच प्रकरणी अँटी करप्शन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले.
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- 33,रा जवळा, ता- जामखेड, जि.अहमदनगर
▶️ *आरोपी* – .१) उज्वला सतिष रजपूत, वय 32 वर्ष, सरपंच, कोकणगाव, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर रा- कोकणगाव,ता.श्रीगोंदा,जि,अहमदनगर
२) सतिष बबन रजपूत, वय 42 वर्ष, धंदा – शेती,रा.कोकणगाव,ता.श्रीगोंदा,जि. अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-* एकूण बिल 4,61,568 रुपये रकमेच्या 10 टक्के/-₹
46,000/-₹ तडजोडी अंती 40,000/-₹
▶️ *लाचेची मागणी -* ता.10/07/2023
▶️ *लाच स्विकारली -* 40,000/- ₹
▶️ *लाच स्विकारली दिनांक -* 23/11/2023
▶️ *लाचेचे कारण* -.तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असुन, त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती,संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचा 4,61568/-₹ चा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता,तक्रारदार यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केले,त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंट ला जमा करणे बाबत सरपंच मॅडम व त्यांचे पती यांना विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46,000/-₹ ची लाच मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे दिनांक 10/07/2023 रोजी दिली. सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 10/07/2023 रोजी कोकणगाव ग्रामपंचायत येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील लोकसेवक सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांचे कडे 46000/-₹ लाच मागणी करुन सदर लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले,बिल जमा झाल्यानंतर आज रोजी आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेऊन बोलविले असता कोकणगाव ग्रामपंचायत येथे आज रोजी सापळा लावण्यात आला,सदर सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक क्रमांक 1 यांनी आज रोजी ग्राम पंचायत कोकणगाव येथे सदर लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ *सापळा अधिकारी*:- शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
मो.न.7719044322
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
मो.न.7972547202
*सापळा पथक* -* पोलीस अंमलदार,पोना/ रमेश चौधरी, पोकॉ/बाबासाहेब कराड,सचिन सुदृक,रवी निमसे, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के,राधा खेमनर चालक दशरथ लाड
▶ **मार्गदर्शक* -*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मो.न.9371957391
▶मा. श्री. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र,नाशिक
9404333049
▶️ श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक
9822627288
▶ **आरोपीचे सक्षम अधिकारी -* मा. विभागीय आयुक्त, नाशिक.
——-•••••••••••••••••••••••—–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
*@ टोल फ्रि क्रं. १०६४*