नगर प्रतिनिधी (दि.२६.डिसेंबर):-अहमदनगर शहरातील सारसनगर येथील नामांकित माउंट लिटेरा झी स्कूलमध्ये वर्ष २०२२-२३ या वर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम,उद्धव अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सौ.निशिता जाधव,श्री.जयंत जाधव,सामाजिक कार्यकर्ते श्याम असावा,श्री.रामदास कानडे,मिलिंद कानडे, भाग्यश्री कानडे,मच्छिंद्र चौधरी,गणेश कानडे,चेतन कानडे,भूषण कानडे उपस्थितीत होते.शुक्रवार दि.२३ डिसेंबर रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.’संस्कार’ हा विषय घेऊन आपली सामाजिक व भारतीय संस्कृती तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे २३ डिसेंबर हा दिवस ‘शेतकरी दिवस ‘ म्हणून भारतात साजरा करण्यात येतो,आपल्या देशाचा पोशिंदा बळीराजाच्या सन्मानार्थ हा दिवस नाट्यरूपात ‘मी बळीराजा’ ही नाट्यछटा सादर करून माउंट लिटेरा झी स्कूल ने साजरा केला.या सोहळ्यामध्ये माऊंट लिटेराच्या पूर्व प्राथमिक शाळेनेही सहभागी होत छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागाने कार्यक्रमास शोभा आणली. याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनीही रॅम्प वॉक मध्ये सहभाग घेऊन आनंद लुटला.
Your message has been sent

उठ भारत भाग्यविधाता’, या नाटिकेने आजच्या युगात आपल्या समाजातील मुलींच्या प्रगतीचा आढावा घेत सर्वच क्षेत्रात मुलींनी कशी आघाडी घेतली याचे दर्शन घडवले,मुख्याध्यापिका यास्मिन काझी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी,अध्यापक वर्ग यांनी एकत्रीतरित्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.याप्रसंगी शाळेच्या संचालिका स्वाती कानडे मॅडम, मुख्याध्यापिका यास्मिन काझी मॅडम,पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गगन वधवा मॅडम तसेच शाळेचे अध्यापक वर्ग व कर्मचारि वृंद उपस्थित होते.
