नगर प्रतिनिधी (दि.२६. डिसेंबर):-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत दोन अत्याचाराच्या घटना घडल्या आहे.पहिल्या गुन्ह्यात २७ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपींनी पीडित फिर्यादी तरुणीला बळजबरीने रिक्षातून गोंविदपुराच्या पुढे काटवनात नेले.पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.आरोपी महिलेने पीडितेचे हात धरले व इतर आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादविक 376 ड,ब,323,504,506,34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या प्रकरणात एका २८ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत फिर्यादी महिलेने कोतवाली पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या विरुद्ध या आधी गुन्हे दाखल केले आहे.त्याचाच राग मनात ठेवून फिर्यादी महिला जिल्हा न्यायालयाच्या समोरून जात असताना तिला विकास वाघ आणि त्याच्या सोबत गुन्हा दाखल झालेल्या लोकांनी बळजबरीने चार चाकी गाडीत बसून नेऊन तु आमचे विरुदध दाखल केलेले गुन्हे मागे घे असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली त्यानंतर फिर्यादीस जवळ असलेल्या काटवणात घेऊन जाऊन तेथे मारहाण करून अत्याचार केल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अफरोज हमिद शेख( रा.सिव्हिल हॉसिपटल जवळ अहमदनगर ) विकास दौलतराव वाघ,संतोष दौलतराव वाघ,(सर्व रा.तपोवन रोड समर्थ टॉवर नाशिक) तसेच यात तीन महिलांचा समावेश असून यांच्याविरोधात भादवि कलम 376ड,365,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending Topics:
Trending
- लोकराजाला वंदन! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रकडून राजर्षी शाहू महाराजांना जयंतीदिनी अभिवादन
- अवैध वाळू माफियांनी पोलिसांच्याच अंगावर घातला थेट जेसीबी,कुठे घडली घटना वाचा सविस्तर
- मोहरमच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४३२ जण तडीपार पोलिसांच्या ‘त्या’ लिस्टमध्ये कोणाकोणाची नावे? शहरात छावणीचे स्वरूप:ड्रोन कॅमेरे,कोम्बिंग ऑपरेशन आणि तगडा बंदोबस्त शांतता भंग केल्यास आता खैर नाही..
- एकाच छताखाली ५० जणांची मोफत रक्त तपासणी;जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण सुरक्षा केंद्राचा पिंपळगाव माळवीत मोठा उपक्रम..!
- संगमनेर बसस्थानकावर सापडलेल्या ‘त्या’ वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू..पण वारसदार गायब..ओळख पटविण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन..
- गुन्हेगारांपेक्षा पोलीस दोन पावले पुढे..! तोफखाना पोलिसांनी दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरांना कसं जेरबंद केलं? वाचा सविस्तर!”
- नेवासा येथील दोघांचे गुन्ह्यात बळजबरीने नाव टाकल्याचे प्रकरण भोवले;राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पीएसआय राजेंद्र वाघ निलंबित!
