अहमदनगर (दि.२५ डिसेंबर):-माळीवाडा बसस्थानका जवळील हॉटेलला आज २५ डिसेंबर रोजी सकाळी आग लागली. यात जीवितहानी टळली आहे.
मात्र,वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली.माळीवाडा बसस्थानक जवळ असलेल्या पंचरत्न हॉटेलला आज सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.
हॉटेलमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले.ही माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तेथे दाखल झाले.आग विझविण्यासाठी दोन बंबाची आवश्यकता भासली.
आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले.मात्र, तोपर्यंत हॉटेलमधील मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या.ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वाटत आहे.