Maharashtra247

पुणे येथे झालेल्या ३७ व्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत अहमदनगरचे पोहेकॉ.राजेंद्र सुद्रिक यांची महाराष्ट्र संघात निवड 

अहमदनगर (दि.२५ डिसेंबर):-नुकतीच ३७ वी राज्यस्तरीय शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा पुणे येथील दिघी येथे संपन्न झाली.

या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला होता.या चाचणीत अहमदनगर जिल्ह्यातून संघाचे नेतृत्व करणारे पोहेकॉ/राजेंद्र आप्पासाहेब सुद्रिक ने.एमआयडीसी पोलीस स्टेशन यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

पोलीस कर्मचारी राजेंद्र सुद्रिक यांच्या निवडीने अहमदनगर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर जसा त्यांचा वचक आहे तशीच खेळामध्ये ही त्यांची चमकदारी आहे.सुद्रिक यांच्या निवडीने अहमदनगर शहरातून तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page