Maharashtra247

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) जिल्हाध्यक्षपदी संजय भैलुमे यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते संजय भैलुमे यांची दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये रिपाईचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव व राज्य उपाध्यक्ष विजयराव वाघचौरे यांनी भैलुमे यांच्या निवडीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला.

लोकसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्हा निरीक्षण आढावा दौरा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुरी फॅक्टरी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रिपाईचे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य सचिव दिपक गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुकाध्यक्ष सतिश मगर, अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे, कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल रन्नवरे, विजय भांबळ, विलास साठे, सुरेश भागवत, रविंद्र आरोळे, गोविंद दिवे, राजूनाना गायकवाड, मनोज काळे, सिद्धार्थ सगळंगिळे, प्रवीण लोखंडे, अयुब पठाण, सलीम शेख, छोटूभाऊ शेख, आंत्वन शेळके, सोमनाथ लोहकरे, कर्जत युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, नितीन भैलुमे, रविंद्र दामोदरे, दया गजभिये, आकाश साळवे, नागेश घोडके, विनोद थोरात, निलेश काकडे, अंकुश भैलुमे, भैय्या नेवसे, प्रदीप भोसले, संतोष मोरे, संजय बनसोडे आदींसह जिल्ह्यातील रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीकांत भालेराव म्हणाले की, भविष्यातील निवडणुका, पक्षाची वाटचाल व रिपाईच्या धोरणानुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारणीत फेरबदल करण्यात येत आहे. सर्व तालुकाध्यक्ष व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्यानुसार ही निवड जाहीर करण्यात आली आहे. हे फेरबदल म्हणजे अंतर्गत वाद नसून, पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. तर दक्षिण जिल्हाध्यक्ष राहिलेले सुनिल साळवे यांना राज्याच्या कमिटीत घेण्यात आले असून, त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. तर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करून भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.विजयराव वाघचौरे म्हणाले की, अनेक वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून भैलुमे ना. आठवले यांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यात कार्य करत आहे. सक्षम कार्यकर्त्याला पदाच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना फक्त खांद्यावर झेंडे घेण्यापुरते मर्यादीत न ठेवता रिपाईमध्ये त्यांना सन्मानाची वागणुक देऊन त्यांच्यात नेतृत्व निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय भैलुमे हे अनेक वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून कार्य करत आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते कर्जत तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी ते सांभाळत होते. त्यांच्याकडे दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भैलुमे यांनी रिपाईच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन कार्य केले जाणार आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन निळ्या झेंड्याखाली रिपाईचे बळ वाढविण्याचे कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page