
पुणे (प्रतिनिधी):-आम आदमी पार्टीच्या वतीने तसेच श्रमिक विकास कामगार संघटना व स्वराज्य बाउन्सर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जानेवारी रोजी मिलिंद बुद्धविहार हडपसर रामटेकडी पुणे 28 या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आम आदमी पार्टीच्या महिला उपाध्यक्ष पूजाताई वाघमारे व संगीताताई बोराडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमामध्ये परिसरातील महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.यावेळी महिलांनी आम आदमी पार्टीचे जे समाज उपयोगी काम आहे ते पाहून पक्षात काम करण्याची व पक्ष प्रवेश करण्याची इच्छा महिला शहराध्यक्षा सुरेखाताई भोसले यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी शहराध्यक्षा सुरेखाताई भोसले म्हणाल्या की आम आदमी पक्ष हा प्रथमता सामाजिक कार्यावर भर देत असतो त्यामुळे महिला वर्गांनी यामध्ये जास्तीत जास्त संख्येने प्रवेश करावा असे आवाहन केले.
यावेळी महिला शहराध्यक्षा सुरेखाताई भोसले,शहर उपाध्यक्षा पूजाताई वाघमारे,संगिताताई बोराडे,छायाताई भगत,ललिता गायकवाड, पक्षाचे सदस्य मनोज थोरात, मिलिंद सरोदे,बापू शेख, ललिता गायकवाड,महीला बाउन्सर व महिलांची व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.