
अहमदनगर (दि.२७ जानेवारी):-कोयता हातात घेवुन दहशत करणाऱ्या तरुणास व तीन महिन्यापासुन बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या अशा दोन्ही आरोपीस तोफखाना पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने केले जेरबंद,
बातमीची हकीगत अशी की,27 जानेवारी रोजी सांयकाळीच्या सुमारास अहमदनगर शहरातील कोठला येथील घासगल्ली सुलभ शौचालय येथे एक इसम हातात घातक कोयता घेवुन परिसरात मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करुन दहशत निर्माण करत असल्याची बातमी तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने त्यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा लावुन या इसमास ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संदिप उर्फ बाला राजु घोरपडे (रा. घासगल्ली,कोठला) असे सांगितले.या इसमासकडुन 500/- रु किं.चा एक लोखंडी कोयता 17 इंच लांबीचा, त्यास 9 इंच लांबीचे धारदार पाते त्याचे समोरील टोक वाकलेले व त्यास 8 इंच लांबीची हिरवे रंगाची मुठ असलेला जुना कोयता जप्त करण्यात आला असुन त्याच्यावर तोफखाना पो.स्टे गुन्हा रजि नं.1566/2024 , भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(3)(1), 110/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये तोफखाना पो.स्टे येथे गुन्हा रजि नं. 1566/2023 भा.दं.वि.क 376 वगैरे मधील तीन महिन्यापासुन बलात्काराच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीनामे आशिष सिध्दनाथ प्रजापती हा गुन्ह्या केल्यापासुन फरार होता.तो अहमदनगर शहरात आल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवुन रवाना केले असता सदरचा आरोपी हा सारसनगर येथे चहाच्या टपरीवर चहा घेताना त्यास पोलीस आल्याचा सुगावा लागताच तो पळु लागला असता त्यास पाठलाग करुन ताब्यात घेतले.
गुन्ह्याचा पुढील तपास हा सपोनि/पुनम श्रीवास्तव या करत आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.हरिष खेडकर,तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पो.उप.नि./सचिन रणशेवरे , पोहेकॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाठ,अहमद इनामदार, दिनेश मोरे,भानुदास खेडकर,संदिप धामणे,वसिम पठाण,पोकॉ/सुमित गवळी, सतिष त्रिभुवन,शिरिष तरटे, दत्तात्रय कोतकर,सतिष भवर, बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.