
अहमदनगर (दि.२ फेब्रुवारी):-कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,शहरातील रेल्वेस्टेशन परीसरात विटभट्टी शेजारी पत्र्याच्या आडोश्याला अविनाश यादव हा विनापरवाना HP व भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅसच्या टाक्या स्वतःच्या कब्जात बाळगुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असताना देखील अनधिकृतरित्या रिफीलींग करीत आहे.
नमूद बातमीची माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना देऊन त्यांना आदेशीत करून पंच तसेच पुरवठा निरीक्षक यांचेसह छापा टाकून कारवाई करण्यास सांगितले.पथकाने बातमीच्या ठिकाणाची पाहणी केली असता,एक इसम घरगुती वापराच्या गॅस टाक्या एका बाजुने दुस-या बाजुकडे ठेवताना दिसुून आला तसेच त्याचे समोर वजन काटा व गॅस रिफीलींगची मशिन ठेवलेली दिसल्याने पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला,त्या ठिकाणी अविनाश यादव (रा.भोसले आखाडा,अहमदनगर) याचे कब्जात 49,000/- रु.किं.चा मुद्देमाल त्यात 14 रिकाम्या एचपी कंपनीच्या घरघुती गसटाक्या,1 भारत गॅस कंपनीची सिलबंद गॅसटाकी, 1 एच पी कंपनीची अर्धवट भरलेली गॅस टाकी,एक वजनकाटा,गँस रिफीलींग प्रेशर पंप दोन्ही बाजुस पाईप जोडलेला असलेला असा मुदेमाल मिळूुन आल्याने पंचासमक्ष पंचनामा करुन तो ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत पोहेकॉ/1475 रवींद्र भास्कर टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुरनं.98/2024 भादवि कलम 285,286,336 सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1995 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री. हरिष खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचने नुसार पोउपनिरीक्षक/ प्रविण पाटील,गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ/रवींद्र टकले, पोहेकॉ/शाहीद शेख,पोकॉ/दिपक रोहकले,पोकॉ/तान्हाजी पवार,पोकॉ/सुरज कदम,पोकॉ/शिवाजी मोरे, पोकॉ/सत्यजित शिंदे,पोकॉ/ सोमनाथ केकान,पोकॉ/महेश पवार यांनी केली आहे..