
अहमदनगर (दि.२ फेब्रुवारी):-तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. आनंद कोकरे यांना दि.1 फेब्रुवारी रोजी गुप्त माहीती मिळाली की,एक इसम हा भिंगारदिवे मळा,मातोश्री हॉटेल समोर येथे एका घरामध्ये गांजा हा मादक पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन आहे.
अशी बातमी मिळाले वरुन पोनि/कोकरे यांनी गुन्हे शोध पथकासह सदर ठिकाणी छापा टाकुन अमोल मदन सदाफुले रा.मानकर गल्ली, भाजी मार्कट शेजारी, दिल्लीगेट हल्ली रा.दातरंगे मळा, हा विक्री करण्याच्या उद्देशाने 34 किलो गांजा , प्रत्येकी दोन किलो वजनाचे पाकिट असे एकुण 17 पाकिट मनोव्यापारावर परीणाम करणारा हिरवट रंगाचा ओलसर उग्र वास येत असलेला गांजा व चारचाकी कार,डिजीटल वजनकाटा,व दोन बॅग असे एकुण 12,63,000/- रु.किं.च्या मुद्देमालासह अटक केली.या बाबत पोकॉ/सुमीत गवळी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन तोफख्राना पोस्टे येथे गुरनं. 122/2024 NDPS कायदा कलम 8 (क), 20 ( ब ) ii (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.निरी.सचिन रणशेवरे हे करत आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,विभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.हरीष खेडकर यांचे मार्गदर्शनाखालील पोनि/श्री. आनंद कोकरे,सपोनि.श्री/ नितीन रणदिवे,पो.उप.निरी/ श्री.सचिन रणशेवरे,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोहेकॉ/भानुदास खेडकर,पोहेकॉ/दिनेश मोरे, पोहेकॉ/सुधिर खाडे,पोहेकॉ/ अहमद इनामदार,पोना/संदिप धामणे,पोना/वसीम पठाण, पोकॉ/सुमीत गवळी,पोकॉ/ सतीष त्रिभुवन,पोकॉ/सतीष भवर,पोकॉ/दत्तात्रय कोतकर, पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉ/ बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.