
अहमदनगर (दि.३ फेब्रुवारी):-भिंगार येथील भूईकोट किल्ला परिसरातून चैन स्नॅचिंग करणारा आरोपी 98 हजार 600/-रुपये किंमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद,
बातमीची हकिगत अशी की,घटनेतील फिर्यादी धनश्री नंदकुमार सोनकांबळे (रा.यशवंतनगर,डेअरी फार्म, चर्चजवळ, केकती,ता.नगर) या नगर पाथर्डी रोडने भूईकोट किल्ल्या समोरुन जाताना कोणीतरी अनोळखी इसमाने फिर्यादीचे गळ्यातील 40,000/- रुपये किंमतीचे 17 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण ओढून तोडून बळजबरीने चोरुन नेले होते या बाबत भिंगार कॅम्प पो.स्टे. येथे गु.र.नं.51/2024 भादविक 392 प्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार हे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,नमुद गुन्हा हा आरोपी नामे सलीम शेख (रा.संभाजीनगर) याने केला असुन तो चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी बु-हानगर ते अहमदगर रोडने पायी चालत येत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन,पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने लागलीच बेल्हेश्वर चौक,बु-हानगर रोड येथे जावुन,सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम पायी चालत येताना दिसला.पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले.त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात सोन्याचे दागिने मिळुन आले. नमुद दागिन्याबाबत त्याचे कडे विचारपुस केली असता त्याने भूईकोट किल्ल्या समोर चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोने विक्री करीता घेवुन जात असल्याची माहिती दिल्याने आरोपीस 98,600/- रुपये किंमतीचे 17 ग्रॅम सोन्याचे मिनीगंठण सह ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.हरीष खेडकर यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,अंमलदार रविंद्र कर्डीले,विशाल दळवी,संदीप चव्हाण,संतोष लोढे,संदीप दरंदले,फुरकान शेख, चापोहेकॉ/अरुण मोरे यांनी केलेली आहे.