
श्रीरामपूर प्रतिनिधी:-महाकाल टायर्स दुकान फोडीतील व रोड रॉबरीतील आरोपीस 62 हजार 500/-रु.किंमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात श्रीरामपूर शहर पोलीसांना यश आले आहे.
दि. 27/12/2023 रोजी रात्री ते 28/12/2023 रोजीचे सकाळी 10/00 वा.चे दरम्यान यातील फिर्यादी बन्सी त्रिबक बर्वे (धंदा-टायर दुकान,रा.इंदिरानगर पाण्याच्या टाकीजवळ, शिरसगांव ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर) यांचे नेवासा ते श्रीरामपुर जाणारे रोडवरील एच.पी.पेट्रोलपंपा जवळ महाकाल टायर्स नावाचे दुकानाचे बंद दरवाजाचे कडी कोयंडा व कुलुप तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने सामान चोरुन नेले आहे.
या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 80/2024 भादंवि कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोनि.नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्हयातील गेलेला मुद्देमाल व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी करुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवुन तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1)दरर्याब पिंजारी 2)समीर पिंजारी 3) करण खाजेकर,या सर्वानी मिळुन केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा शोध घेत असतांना तपास पथकास माहिती मिळाली की,गुन्हयातील दोन आरोपी हे एच.पी.पेट्रोलपंप नेवासा रोड येथे उभे आहेत.
अशी माहिती मिळाल्याने तपास पथक तात्काळ सदर ठिकाणी गेले असता तपास पथकास पाहुन दोन इसम पळुन जावु लागले असता तपास पथकाने त्याचा शिताफिने पाठलाग करुन त्याना ताब्यात घेतले व त्याना त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव 1) दरर्याब युसुफ पिंजारी, रा. आशिवार्दनगर,वार्ड नं. 01, श्रीरामपूर जि.अहमदनगर. 2) समिर शब्बीर पिंजारी रा. भिमनगर,वार्ड नं.06, श्रीरामपूर असे असल्याचे सांगुन सदर गुन्हयाबाबत त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानी सदरचा गुन्हा आम्ही व आमचा साथिदार नामे करण खाजेकर याच्या सोबत मिळुन केल्याची कबुली दिल्याने त्याना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली व त्याच्याकडुन गुन्हयातील चोरी केलेला वरील नमुद प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर,डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांचे कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,पोलीस उपनिरीक्षक/दादाभाई मगरे,परि.पोलीस उपनिरीक्षक/दिपक मेढे, पाहेकॉ/रघुवीर खेडकर,पोहेकॉ/जयवंत तोडमल,पोना/रघुवीर कारखेले,पोना/प्रशांत बारसे, पोकॉ/राहुल नरवडे,पोकॉ/ गौतम लगड,पोकॉ/ रमिझराजा अत्तार,पोकॉ/ संभाजी खरात,पोकॉ/अजित पटारे,पोकॉ/कैलास झिने, पोकॉ/आकाश वाघमारे,पोकॉ/बाळासाहेब गिरी तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/संतोष दरेकर,पोना/सचिन धनाड,पोकॉ/वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोना/प्रशांत बारसे हे करीत आहेत.